दहा वर्षानंतर जुळून आले मैत्रीचे स्नेहबंध

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष सन 2013-14 च्या इ. दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात चिल्हे येथील फार्म हाऊसवर स्नेहमेळावा साजरा केला. सुमारे 10 वर्षांची ही भेट प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरली. जुन्या आठवणींने व मित्र मैत्रिणींच्या भेटीने साऱ्यांनाच मोठा आनंद झाला होता. यावेळी अनेकांनी आपापले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Exit mobile version