म्हसळ्यात कृषी दिन साजरा

। म्हसळा । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्यात कृषीदिन साजरा होतो. या निमित्ताने म्हसळा पंचायत समिती आणि केशवराव खांबेटे सार्वजानिक वाचनालयात कृषीदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील, गट विकास अधिकारी माधव जाधव, कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहु-फुले, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते म्हसळा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या प्रांगणात वनौषधी आवळा वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी महादेव पाटील, संजय खांबेटे, अशोक काते, पांडुरंग पाटील, उदय कळस, माधव जाधव, राजेंद्र ढंगारे, बबन कांबळे, अशोक बागकर, दामोदर दिघीकर, हेमंत माळी, चौधरी, सुजय कुसाळकर, अनिता दानवे, अस्लाम कौचाली, भोनकर, दिपक पाटील, धनंजय सरनाईक, देवरे, सोनावणे, गणेश देवडे, मोरे किशोर मोहिते, प्रकाश कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version