। मुंबई । प्रतिनिधी ।
खरीप हंगामात कृषीमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे. पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वार्यावर आहे. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षाला वेगळे वळण लागले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी मते प्रदर्शित केली आहेत. सत्तासंघर्षामुळे शेतकर्यांचा बळी नको जायला, असे मत शेतकर्यांनी व्यक्त करीत राजकिय घटनांवर नाराजी व्यक्त केली आहे.