| नाशिक | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना, 1995 सालच्या एका प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या निकालाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी व मंत्रिपद देखील धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अवघ्या दोन तासात जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत असणार आहे.