| कल्याण | प्रतिनिधी |
धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार धक्का लागण्याच्या कारणातून वाद झाला, या वादानंतर या तरुणानं धावत्या लोकलमध्ये तीन जणांवर चाकू हल्ला केला आहे. शेख जिया हुसेन असे या हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन कल्याणहून दादरला निघालेली होती. आज गुरुवार (दि.20) सकाळी कामावर जाण्याची घाई असल्याने या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जो हल्लेखोर तरुण आहे शेख जिया हुसेन याला मुब्राला उतरायचे होते. मात्र, त्याला उतरायला जागा मिळत नव्हती. त्याला जेव्हा माहिती पडलं की ही फास्ट ट्रेन मुब्रा येथे थांबणार नाही तेव्हा तो लोकांना धक्का मारून, दरवाजाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न करत होता. यावरून वाद सुरू झाला, काही प्रवाशांनी त्याच्यासोबत वाद घातला. या वादानंतर या तरुणानं धावत्या लोकलमध्ये तीन जणांवर चाकू हल्ला केला आहे.