| पाली | वार्ताहर |
स्व. वसंतराव नाईक यांच्या दि.1 जुलै जन्मदिनानिमित्त सुधागड तालुका कृषी विभागाच्या वतीने ‘कृषी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यात कृषी विभागाकडून दि.17 जूनपासून कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
कृषी संजीवनी पंधरवडा दि.17 जून ते 1 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येत असून, यामध्ये सुधागड तालुक्यातील गावात कृषी विभागाच्या विविध योजना, भात लागवडीच्या विविध पद्धती, भातलागवड तंत्रज्ञान, फळबाग लागवड योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना याविषयी कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी सखोल मार्गदर्शन करीत आहेत. या संजीवनी पंधरवड्याची सांगता दि.1 जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून साजरा करुन करण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील शेतकरी बंधू-भगिनींना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याची आवाहन सुधागड तालुका कृषी अधिकारी एस.के. कोळपे यांच्याकडून करण्यात आले आहे.