| खरोशी | प्रतिनिधी |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त विद्यापीठाच्या राज्यभर असलेल्या अभ्यास केंद्रावरील विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांच्या निरीक्षणासाठी राज्यभरातील 538 परीक्षा केंद्रांवर एआय तंत्रज्ञानाने समृद्ध असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.
परीक्षा पारदर्शक, सुरक्षित व गैरप्रकारमुक्त वातावरणात होण्यासाठी मा. प्र, कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार विद्यापीठ प्रशासनाने हे प्रगतीशील पाऊल उचलले आहे. या परीक्षा दिनांक 21 मेपासून सुरू झाली असून, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या मुख्य परीक्षा या 27 मेपासून सुरू होत आहे. विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रांतर्गत असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सर्व परीक्षाकेंद्रांवरील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यापासून ते उत्तरपुस्तिका सीलबंद होईपर्यंतच्या सर्व हालचाली मॉनिटर करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा कालावधीतील सीसीटिव्ही छायाचित्रणदेखील उपलब्ध असेल असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व वित्त अधिकारी मा. डॉ. गोविंद कतलाकुटे आणि मा. परीक्षा नियंत्रक श्री भटप्रसाद पाटील यांनी सांगितल






