। कर्जत । प्रतिनिधी ।
सद्भाव फांउडेशन मुंबई शाखा कर्जत यांच्या माध्यमातुन उपजिल्हा रूग्णालयास मदत करण्यात आली. यावेळी उपजिल्हा रूग्णालयास बसण्यासाठी बाकडे देण्यात आले. तसेच, कळंबोली वाडी येथे हळदी कुंकु कार्यकम घेण्यात आला.
कर्जत व खालापुर तालुक्यात रोटरी क्लब बॉम्बे मेट्रोपॅलिटन व सदभाव फांउडेशन मुंबई कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने 160 वैयक्तिक शौचालय बांधुन झाले आहेत. त्याचे उद्घाटन नीता दोशी निमीशभाई, रक्षा बेन, कराचीवला भाई, हिना बेन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास सरपंच जयवंती कोळंबे, श्वेता हाडप, सुनंदा लाड, प्रविण पाटील, प्रगती पाटील, संतोष धकवळ चेतन भाई, संतोष पारे, केतन लाड, संपद हडप, दशरथ देशमुख, विजय मते, चित्रा लोहकरे, सदा मते, विठोबा पाटिल व मतेवाडी ग्रामस्थ व अंगणवाड़ी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
सद्भाव फांउडेशनतर्फे रुग्णालयास मदत
