| रसायनी । वार्ताहर ।
चौक ग्रामीण रुग्णालयच्या अधिक्षक सरला काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे एड्स व क्षयरोग या विषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण रुग्णालय चौकचे समुपदेशक अशोक लोंढे यांनी याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता 11, 12 वीच्या 140 विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती .एड्स व क्षय रोग का? व कसा होतो याच्यावर परिसंवाद झाला. यावेळी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बी.डी. भोमले, एम. बी.सावंत, एम.एस.देशमुख, के.एस. पुजारी, विद्यार्थी, पालक व कनिष्ठ महाविद्यालय कर्मचारी उपस्थित होते.