बांगलादेशमध्ये हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळलं

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बांगलागदेश हवाई दालचे एक प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान सोमवारी (दि.21) राजधानी ढाका येथील शाळेवर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान एकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनी बनावटीचे एफ-7 हे विमान ढाकाच्या उत्तरा भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून दाखवण्यात येत असलेल्या फुटेजनुसार, अपघातस्थळी आगीचे लोट आणि काळा धूर पाहायला मिळत आहे. दरम्यान बचाव पथकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.

Exit mobile version