एअरटेल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ताब्यात

। रसायनी । प्रतिनिधी ।

घोडिवली गावाच्या हद्दीत अंजरुण फाटा येथील ईंन्डस कंपनीच्या एअरटेल टाॅवरच्या बाॅक्समधील असलेल्या अमरराजा कंपनीच्या एकूण 38 बॅटऱ्या अंदाजे किंमत 24,700 रुपयांचा माल चोरीला गेल्याची खालापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. या गुन्ह्यांची खालापूर तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने समांतर तपास करीत घटनास्थळाचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमधील संशयित वाहनाचे तसेच आरोपीचा गोपनीय बातमी दारामार्फंत शोध घेऊन तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात अविनाश मनोहर चव्हाण (26), रोहित मनोहर चव्हाण (25) दोघेही राहणार उल्हासनगर आणि विजय सुरेश चव्हाण (2६ रा. खालापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टाटा कंपनीचा टेम्पो (अंदाजे किंमत 7 लाख) पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई एपिआय मानसिंग पाटील, पोसई प्रसाद पाटील, सहायक फौजदार संदीप पाटील, पोलीस रवि मुंडे, प्रतिक सावंत, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे, प्रदिप खरात यांच्या पथकाने केली. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version