| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यात नव्याने नियुक्ती झालेले तहसीलदार अभय चव्हाण यांची खालापूर तालुकाध्यक्ष अनंत ठोंबरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
खालापूर तालुक्याला नव्याने आलेले तहसीलदार अभय चव्हाण यांची खालापूर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गाव पोलीस पाटील यांच्या समस्या सोडविण्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.