ॠषीकेश गाणारचे अजय-अतुलकडून कौतुक

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
जागतिक स्तरावरील ऑनलाईन पद्धतीने झालेल्या पेंटाथॉन या प्रदर्शनाला लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये स्थान मिळवून देणार्‍या ॠषीकेश चंद्रकांत गाणार या भारतीय चित्रपट सृष्टीतील संगीत व ग्राफिक्स विभागात फ्रीलांसर आर्टीस्ट म्हणून काम करणार्‍या नांदगावच्या कलाकाराचे ख्यातनाम संगीतकार गायक अजय-अतुल यांनी कौतुक केले आहे.

28 मे हा दिवस जागतिक स्तरावर मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. हा विशेष दिवस मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनाचे महत्व सांगण्यासाठी व महिलांना शिक्षित करण्यासाठी प्रदर्शन भरवून साजरा केला जातो. मुंबईतील संस्कृती आर्टस् या संस्थेच्या संयोजनाखाली हे भव्य प्रदर्शन एकाचवेळी भारतासह पॅरिस व लंडन येथे सुरु होते. या समाज विधायक व जनजागृतीपर जागतिक अभियानात सहभागी सदर कलाकृतीचे संगितकार अजय अतुल यांनी कौतुक करुन आपल्या संग्रही ठेवली आहे. ॠषीकेशच्या या यशाबद्दल मुंबईसह नांदगाव ,मुरुड आदी भागातील लोकांनी विशेष कौतुक केले आहे.

Exit mobile version