। पेण । वार्ताहार ।
पेण कोपर येथून 12 मे रोजी प्रवासाला सुरूवात करून अजय म्हात्रे हा 5 जून रोजी सायंकाळी 5ः45 च्या सुमारास अडिच हजार किलो मीटरचे अंतर पार करून अखेर लडाख येथे पोहचला. शेवटच्या टप्प्यासाठी अजयचा भाऊ पेण येथून मनाली येथे रवाना झाला होता. शेवटचा खडतर प्रवास करताना अजयला ऑक्सिजनचा मोठा प्रॉब्लेम झाला होता त्यावर ही मात करत अजय लडाखला पोहचला हे त्याचे धाडस आहे. त्यानी केलेल्या या कौतुकास्पद कामगीरीसाठी सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.