रोह्याच्या लोकप्रतिनिधींना अजित पवारांच्या कानपिचक्या

| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहरात असलेल्या शहर सभागृहावर साडे तीन कोटी रुपये खर्च करून देखील नव्याने उभारणी करावी लागत असल्याने नव्याने होणारे बांधकाम पुढील शंभर वर्षे टिकेल या पद्धतीने उभारण्यात यावे असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीना कानपिचक्या दिल्या आहेत. डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या भूमीमपूजन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार ,पालकमंत्री अदिती तटकरे,खा सुनील तटकरे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर,आ अनिकेत तटकरे,पोलिस अधीक्षक अशोक दुधे,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जि. प उपाध्यक्ष सुधाकर घारे,माजी आमदार सुरेश लाड,प्रांताधिकारी यशवंत माने रोहा नप मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, या सभागृहासाठी 22 कोटी 70 लाख रुपयांचे काम असले तरी पाच कोटी रुपये प्राथमिक स्वरूपात दिले आहेत.उर्वरित निधी देखील देण्याचे आश्‍वासन वित्तमंत्री पवार यांनी जुने सभागृह काही वर्षातच पाडावे लागले पण नूतन सभागृह काम करताना ते शंभर वर्षे कसे टिकेल याची काळजी घ्यावी असे सांगत त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीना कानपिचक्या दिल्या.त्याच प्रमाणे डॉ चिंतामणराव देशमुख यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेतला.डॉ चिंतामणराव देशमुख यांना वनस्पतींची आवड होती.तरी त्यांच्या नावाने सुंदर असे उद्यान उभे करावे अशी अपेक्षा ना तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

सीडींचा चुकीचा उल्लेख
सूत्रसंचालकाकडून वारंवार डॉ चिंतामणराव देशमुख यांचा भारताचे पहिले अर्थमंत्री असा चुकीचा उल्लेख केला जात होता.आ अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अनिकेत तटकरे व आदिती तटकरे यांच्या कडून देखील डॉ चिंतामणराव देशमुख यांचा देशाचे पहिले अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने रोहेकराना शरमेने मान खाली घालावी लागली.

यावेळी अनिकेत तटकरे,अदिती तटकरे यांनीही विविध विकासकामांचा आढावा घेतला. दादा, तुमच्या पसंतीचे काम आम्ही करू शकलो यात आनंद.आयुर्विम्याचे खाजगीकरण होत आहे पण आयुर्विम्याचे राष्ट्रीयकरण करण्यात रोह्याचे सुपुत्र डॉ चिंतामणराव देशमुख यांचा सिहांचा वाटा होता याचा अभिमान आहे. शहर सभागृहाची जागा नगरपालिकेच्या मालकीची असल्याचा उल्लेख खा सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात करत जागा कोणाची यावरून सुरू असलेल्या चर्चाना पूर्णविराम दिला. रेवस करंजा सागरी पुलाचे श्रेय देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचा सांगण्याचा प्रयत्न खा तटकरे यांनी केला.जिप ,पंस निवडणुकांच्या पाश्‍वर्र्भूमीवर रोहा पंस नूतन इमारत बांधण्याचा विचार सुनिल तटकरे यांनी व्यक्त करत ग्रामीण मतदारांना चुचकरण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळला
ना अजित पवार यांच्या कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारमधील सहकार्‍यांचा आवर्जून उल्लेख केला. पण पालकमंत्री अदिती तटकरे,खा सुनिल तटकरे व आ अनिकेत तटकरे यांच्या कडून मात्र मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख करण्याचे टाळल्याचे प्रकर्षाने दिसून आले.

Exit mobile version