अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

| महाड | प्रतिनिधी |
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा मंगळवारी महाड भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हतेच अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष बिपिन महामुणकर,तालुकाध्यक्ष जयवंत दळवी , निलेश तळवटकर , आधी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version