महादेववाडीत अखंड हरीनाम सप्ताह

| कोलाड । वार्ताहर
महादेववाडी येथे गुरुवार दि.30 मार्च ते रविवार दि.2 एप्रिल पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे. गेली 60 वर्षाची अखंड यशश्‍वि परंपरा राखत महादेववाडी येथे होणारा धार्मिक व अध्यात्मिक भक्तिमय सोहळा महादेववाडी गावानी जतन करुन ठेवला असून दररोज पहाटे काकड्याचे भजन, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे पारायण, प्रवचन, हरिपाठ, किर्तन व नंतर हरिजागरण होईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नथुराम बाईत, धोंडू चितळकर, चंद्रकांत भऊर, शांताराम बाईत, पांडुरंग बाईत, तसेच ग्रामस्थ मंडळ, श्रीराम मित्रमंडळ, नवतरुण युवक मंडळ, महिला मंडळ महादेववाडी मेहनत घेत आहेत.

Exit mobile version