| सुकेळी | वार्ताहर |
कार्तिकी एकादशी झाल्यानंतर रायगडमध्ये सर्वत्र वेध लागतात ते अखंड हरिनाम सप्ताहाचे. रोहा तालुक्यातील बाळसई येथे शनिवार दि.13 ते मंगळवार दि.16 जानेवारी असे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवस सुरू असणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात बाळसई ग्रामस्थांच्या उपस्थितीत कळशपुजन, ध्वजारोहण झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचनाला सुरुवात होईल. यावेळी भगवान कदम, नित्यानंद मांडवकर, गजानन बलकावडे, निलेश पवार, नरेश जाधव, पुरूषोत्तम पाटील यांची कीर्तन होणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ मेहनत घेत आहेत.







