। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील श्री गणेश सत्संग मंडळ येथे श्री साती आसरा देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षांपासुन चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्ययांचे पारायण व त्या निमित्ताने हरिपाठ, प्रवचन, किर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन दि.7 व 8 पर्यंत करण्यात आले आहे.
या निमित्ताने दि.7 रोजी सकाळी मंगल विधी-कळस स्थापना, माऊली पूजन, विणा पूजन, अनुष्ठान स्थापना, गुरुपुजन, ध्वज रोहन, दुपारी ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्ययाचे पारायण, सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी भुषण तळणीकर यांचे किर्तन. तसेच, दि.8 रोजी पहाटे काकड आरती, सकाळी विजयानंद तेलंगे यांचे किर्तन, सायंकाळी नगर प्रदक्षिणा होणार असून सर्व भाविकांनी श्रवण सुखाचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांकडून करण्यात येत आहे.