गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी अलिबागचा संघ रवाना

।अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नुकत्याच झालेल्या शिर्डी येथे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळणार्‍या खेळाडूंची गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. अलिबागचा संघ गुरवारी (दि.28) सकाळी 11 वाजता अलिबाग येथून रवाना झाला. या स्पर्धेमध्ये बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, पॅनक्रीएशन, आणि कराटे फाईट अशा स्पर्धेचे प्रकार आहेत.
खेळाडूंची पुढील प्रमाणे नावे:-
अनघा हेमंत पाटील (झिराड), जिज्ञासा सुधीर पाटील (पेढामबे), वेदिका संतोष कावळे (नवगाव ), तनया किरण मंचेकर (अलिबाग), समृद्धी सुशील भोईर (चोंढी), सुभाष शंकर शर्मा (अलिबाग), परी उमेश माळवी (मानी), रोहन अरुण गुरव (रामनाथ), हर्षाली योगेश पाटील (पंतनगर), रुद्र संदीप वार्गे (मुरुड), ऋतिका संतोष पाटील(मानी), ऋग्वेद हेमंत म्हात्रे (हाशिवरे), सानिका संतोष पाटील (मानी) हे सर्व खेळाडु अलिबागच्या संघासोबत कराटेचे मुख्य प्रशिक्षक आणि संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष रामचंद्र कवळे (नवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा येथे रवाना झाले आहेत.

Exit mobile version