अलिबाग समुद्रकिनारी अपघात; उंटावर बसलेली मुलगी बालबाल वाचली

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |

अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांना भुरळ पाडण्यासाठी विविध थरारक अशी सफारी केली जाते. वाळूत सुस्साट गाडी फिरवून पर्यटक त्याचा आस्वाद घेतात. अनेकदा अतिउत्साहामुळे याठिकाणी अपघात झाल्याचे प्रकारही घडले आहेत. असाच एक अपघाताचा व्हिडिओ सध्या अलिबागमध्ये तुफान व्हायरल होत आहे.

वाळूत चालवली जाणारी गाडी एक मुलगी चालविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, तिला गाडी अनियंत्रित झाल्यामुळे तिने उंटाला जोरदार धडक दिली. यामध्ये उंटावर बसलेल्या मुलीने उंटाची दोरी न सोडल्यामुळे ती बचावली, असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Exit mobile version