| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
रेवदंड्याकडून अलिबागकडे जात असताना आक्षी पुलानजीक स्कोडा कारचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की गाडी (एमएच-43-एआर-4220) विरुद्धदिशेला येत एका झाडावर आदळून पलटी झाली. स्थानीकांच्या मदतीने गाडीतील दोघांना बाहेर काढून त्यांना अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू आहेत. दोघेही लोणावणा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तसचे, गाडी चालक मद्यावस्थेत भरधाव गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्ष दर्शींकडू सांगण्यात येत आहे.
