| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 34 वर्षीय महिलेने आपल्या 4 वर्षाच्या मुलासोबत गळफास घेत जीवन संपवलं. एका आईने आपल्या लेकरासोबत आत्महत्या का केली असावी असा सवाल करत अनेकांना घातपाताचा संशय येत आहे. दरम्यान पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. कांदिवली पूर्वमधील समता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. येथील हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत गळफास घेत आत्महत्या केली. पु्ष्पा दत्त (34) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी एडीआर दाखल करत हत्या आहे, की आत्महत्या या अँगलने तपास केला जात आहे. परंतु पोलिसांसह स्थानिकांना घातपाताचा संशय येत आहे. एक 34 वर्षीय आई आपल्या 4 वर्षाच्या मुलासोबत आत्महत्या का करेल असा सवाल करत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.