| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा (उत्तर) अंतर्गत तालुका शाखा अलिबागची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रकीया पार पडली. वाघोली येथील सारनाथ बुद्धविहारामध्ये रविवारी (दि.8) सभा घेण्यात आली. या सभेत निवडीचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला सुप्रिया वाघपंजे यांनी सभेचा अजेंठा वाचन केले. तालुका शाखेचा कार्य अहवाल, जमा खर्च अहवालाची तपासणी जिल्हा कमिटीच्या माध्यमातून तपासण्यात आली. त्यानंतर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी संजय गायकवाड, सरचिटणीसपदी गजानन वर्तक, कोषाध्यक्षपदी अतिश कदम, संस्कार उपाध्यक्षपदी सदानंद वाघपंजे, संस्कार सचिवपदी पांडूरंग कदम यांची निवड झाल्याचे सरचिटणीस राजेश भालेराव यांनी जाहिर केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेश भालेराव, कोषाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, जिल्हा पर्यटन व प्रचार सचिव प्रमोद जाधव, जिल्हा संघटक संदेश कांबळे आदींसह सभेच्या अध्यक्षा सुप्रिया वाघपंजे आदी उपस्थित होते.