| पनवेल | वार्ताहर |
उलवे परिसरातील तलावात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत. या महिलेचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, केस लहान काळे, चेहरा गोल, बांथा मध्यम, नेसणीस गडद निळा रंगाचा कुर्ता त्यावर फुलांची डिझाईन, फिकट लाल रंगाचा गमचा सदृश्य टॉवेल, फुलांची डिझाईन असलेला पायजमा आणि डाव्या पायात एक निळ्या रंगाची स्लिपर घातलेली आहे. या महिले बद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवा पोलीस ठाणे (8669789100) किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कणसे यांच्याशी संपर्क साधावा.