| कर्जत | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले भारतीय कलाकार पराग बोरसे यांना प्रतिष्ठित पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका तर्फे दि. 20 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क शहरात त्यांच्या कलाकृतींचे लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन सादर करण्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित करण्यात आले आहे. हे डेमोन्स्ट्रेशन 15 ग्रामर्सी पार्क साउथ-न्यूयॉर्क येथील स्टुडिओत होणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील कलाकार, संग्राहक आणि कलारसिक सहभागी होणार असून, पराग बोरसे यांच्या लोकप्रिय पेस्टल शैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही दुर्मीळ संधी असणार आहे. याबद्दल बोलताना बोरसे म्हणाले की, न्यूयॉर्कमध्ये माझे चित्र प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी आमंत्रण मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. भारतीय कला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले.