| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा दि.०२ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दिनांक १९ जुलै २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजता मंगल कार्यालय, सहाण बायपास, ता.अलिबाग येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेमध्ये पक्षाचे जेष्ठ नेते व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी आपल्या विभागातील पदाधिकारी / प्रमुख कार्यकर्ते यांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन अलिबाग तालुका चिटणीस अनिल शांताराम पाटील यांनी केले आहे.