खळबळजनक! पृथ्वी धोक्यात;टाइम ट्रॅव्हलरचा दावा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
शास्त्रज्ञांना अंतराळाच्या एका कोपर्‍यातून पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळत आहेत. अवघ्या 82 तासात जवळपास 1863 सिग्नल मिळाले आहेत. यामुळे एलियन्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एलियन्स खरोखर अस्तित्वात आहेत की नाही? टाइम ट्रॅव्हलिंग शक्य आहे का? या प्रश्‍नांची उत्तर अद्याप शास्त्रज्ञांनाही मिळालेली नाहीत. हे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. मात्र, जगातील अनेकांनी याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आहेत. या वर्षी 8 डिसेंबरला एलियन्स पृथ्वीवर उतरतील, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने केला आहे.

या आकाशगंगेत केवळ पृथ्वीवरच जीवन आहे, हे स्वीकारण्यास शास्त्रज्ञ तयार नाहीत. पृथ्वी वगळता काही ग्रहावर जीवन असू शकतं याचा शोध शास्त्रज्ञ मागील अनेक वर्षांपासून घेत आहेत. यात त्यांना अद्याप यश आलं नाही. अशात शास्त्रज्ञांना अंतराळाच्या एका कोपर्यातून पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळत आहेत. अवघ्या 82 तासात जवळपास 1863 सिग्नल मिळाले आहेत. यामुळे एलियन्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खरंच एलियन असतील आणि ते पृथ्वीवर आक्रमण करतील तर काय होणार? यावर खगोल शास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी या निवड कल्पना असल्याच सांगितल आहे. पृथ्वी वगळता इतर कुठल्यातरी ग्रहावर जीवन आहे, याचा ठोस पुरावा सध्यातरी शास्त्रज्ञांना मिळाला नसल्याचं चोपणे यांनी सांगितलं.

या स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलने आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो देखील दाखवले आहेत. शास्त्रज्ञांनी पुराव्याच्या आधारे एलियन असल्याचा दावा मान्य केला नसला तरी. त्या व्यक्तीच्या दाव्यानुसार, या वर्षी 30 नोव्हेंबर जेम्स वेब टेलिस्कोप एक नवीन ग्रह शोधेल, जो पृथ्वीसारखाच असेल. त्याचवेळी त्यांनी असा दावाही केला आहे की, यावर्षी 8 डिसेंबरला एक उल्का पृथ्वीवर धडकणार आहे.

या व्यक्तीने असा दावा केला आहे की मार्च 2023 मध्ये वैज्ञानिकांची एक टीम प्राचीन प्रजाती शोधून काढेल. तसेच मे 2023 मध्ये अमेरिकेत भयानक त्सुनामी येईल. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो टाइम ट्रॅव्हलर आहे आणि तो 2671 मधून टाइम ट्रॅव्हल करुन परतला आहे.

Exit mobile version