चिरनेरच्या विकासासाठी सर्वपक्षियांनी एकत्र यावे; महेंद्र घरत

| उरण | वार्ताहर |
ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी चिरनेर येथे बोलताना व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य परदेशी व पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी सुरेश पाटील यांनी आपल्या निधीतून महागणपती भक्तांसाठी भक्तनिवासाची इमारत तसेच चिरनेर ग्रामपंचायत सदस्य किरण कुंभार यांनी आपल्या स्वखर्चातून ऐतिहासिक माझं चिरनेर हे नामफलक बनवलं आहे.

या दोन्ही कामांचं उद्घाटन महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती राजेंद्र खारपाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पाडगावकर, आखलाक शिलोत्री, विनोद म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, बाजीराव परदेशी, भास्कर मोकल, सुरेश पाटील, उपसरपंच प्रियांका पाटील, गणेश सेवक, पद्माकर फोफेरकर, अलंकार परदेशी, घनश्याम पाटील, तुषार पाटील, डॉक्टर सुधीर केणी,विनोद कदम, संतोष ठाकूर, ज्ञानप्रकाश पाटील, रमेश गोंधळी, जगदीश ठाकुर, धनाजी नारांगीकर, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत तर आभार प्रदर्शन गणेश चिरनेरकर यांनी केले.

Exit mobile version