ग्रामपंचायत सदस्य मनोहर जांभूळकर यांची चौकशीची मागणी
| पाली/ वाघोशी | प्रतिनिधी |
पाली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोगातून करण्यात आलेल्या निधीच्या खर्चात भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य मनोहर काशीराम जांभूळकर यांनी केले आहेत. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाली सुधागड यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी करणारा लेखी अर्ज सादर केला आहे.
जांभूळकर यांनी अर्जात नमूद केले आहे की, सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामांच्या नावाखाली पंधरावा वित्त आयोगातून निधी खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र या खर्चाचा कोणताही खुलासा ग्रामसेवक, सरपंच किंवा उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिलेला नाही.गावातील गटार कामासाठी 7 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायतीच्या खात्यातून 65,208 रुपये काढले गेले असूनही प्रत्यक्षात ते काम झालेले नाही, असा आरोप केला आहे.







