माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

। तळा । वार्ताहर ।

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच, वाटचालीत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. या मेळावा आयोजनामुळे एक नवीन दिशा आम्हाला मिळणार असून महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेमार्फत विविध चांगले उपक्रम राबविले जातील, असे मत व्यक्त केले.

माजी विद्यार्थी ध्रुव राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना आमच्या व्यक्तिगत विकासामध्ये महाविद्यालयाचे स्थान महत्वाचे आहे. महाविद्यालयातील जुन्या आठवणींना ऊजाला देत आम्ही महाविद्यालयामुळे कसे घडत गेलो हे सांगितले. माजी विद्यार्थी समन्वयक मनोज वाढवळ यांनी माजी विद्यार्थी संघटना स्थापन करून संघटने विषयी उद्दिष्टे काय असली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती दिली.

Exit mobile version