शिक्षकांच्या हितासाठी सदैव पाठीशी: माजी आ. बाळाराम पाटील

| पनवेल | प्रतिनिधी |

शिक्षकांच्या हितासाठी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघटना अखंड पाठीशी राहील, असे कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. ते राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार प्रदान सोहळ्यात दि. 5 जून रोजी व्ही.के. हायस्कूल पनवेल येथे बोलत होते.

कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी माजी शिक्षक आमदार तथा संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक बाळाराम पाटील, तर अध्यक्ष स्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल नाचपल्ले हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये लोहारा/उमरगा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आमदार प्रवीण स्वामी, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, सरचिटणीस संतोष भोजने, उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राजेंद्र खैरनार, संपर्कप्रमुख मंगेश सुवर्णकार, प्रसिद्धीप्रमुख धनाजी घरत, लहू राक्षे, रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी घरत, खासगीप्रमुख राजन पाटील, राज्यसंघटक प्रशांत शेवाळे, महिला अध्यक्षा रेखाताई सुडे, महिला चिटणीस विनया जाधव कार्याध्यक्ष लीना मगर, नाशिक विभागप्रमुख संदीप गीते, छ. सांभाजीनगर विभाग प्रमुख विजयकुमार तेलंग यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष तसेच राज्यभरातील विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राज्यातील आदर्श व गुणवंत शिक्षिका शिक्षक यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, क्रांतीसूर्य महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार अशा तीन पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version