अंबाती रायडू आयएलटी 20 लीग खेळणार

| नवी दिल्ली | वार्ताहर |

अंबाती रायुडू आयएलटी 20 लीगमध्ये एमआय एमिरेट्सकडून खेळताना दिसणार आहे. रायडूने मे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसांनी त्याने पक्ष सोडला. त्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबातीने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर लिहिले होते की, तो 20 जानेवारीपासून दुबईमध्ये आयएलटी-20 मध्ये एमआय अमीरातीजकडून खेळणार आहे. अंबाती 2010 ते 2017 या कालावधीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. यानंतर तो 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झाला होता. त्याने दोन्ही संघांना आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने मुंबईसाठी तीन आणि सीएसकेसाठी तीन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्याची गणना सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने एकूण 204 आयपीएल सामन्यांमध्ये 4348 धावा केल्या. त्यामध्ये एक शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. अंबातीने 2013 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. पण खराब फॉर्ममुळे तो टीमच्या बाहेर राहीला. त्याने भारतासाठी 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1694 धावा केल्या. यानंतर त्याने 6 टी-20 सामन्यात 42 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या कारकिर्दीत तीन शतकेही झळकावली. रायडूने 2019 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Exit mobile version