अमिषा ठाकूर ठरली मिस नवी मुंबई

। नवी मुंबई । वार्ताहर ।
मिस नवी मुंबईच्या अकराव्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी सोळा सौंदर्यवतींनी आपल्या दिलखेच अदांनी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्‍या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई 2022 चा ताज अमिषा ठाकूर या सौंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसर्‍या व तिसर्‍या जागेवर अनुक्रमे श्रुती राऊल व चहात सिंगहिने बाजी मारली. परीक्षक म्हणून फेमिना मिस ग्रँड इंडिया 2019 ची विजेती व अभिनेत्री शिवानी जाधव, अभिनेत्री आणि निर्माती रोहिनी कपूर, डॉ.अमित कारखानीस, संजीव कुमार, अशोक मेहरा यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

या स्पर्धेचे हे अकरावे पर्व होते. या वर्षी चारशेच्यावर मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सोळा सौंदर्यवती अंतिम फेरीत गेल्या. विशेष म्हणजे या स्पर्धेची तिसरी फेरी लाईव्ह बँडच्या गायनावर सादरीकरण झाले. या स्पर्धेत मिस ग्लोइंग स्किन अमिषा ठाकूर, मिस उत्कृष्ट नयन अमिषा ठाकूर, मिस उत्कृष्ट बुद्धिमत्ता श्रुतिका राठोड, मिस मिस स्वभावसाधर्म्य अमिषा ठाकूर, मिस इंटरनेट पॉप्युलर मुस्कान बत्रा, मिस स्टाईल आयकॉन सानिका दिवेकर, गर्ल ऑफ दि शो शताक्षी किरण, उत्कृष्ट रॅम्प वॉल्क चाहत सिंग, बॉडी ब्युटीफुल श्रुती राऊळ, मिस फोटोजेनिक रक्षा पंजाबी, उत्कृष्ट हास्य श्रुती राऊळ, फ्रेश फेस खुशी अजवानी यांनी इतर बक्षिसे पटकाविली.

अंतिम स्पर्धेत ज्या सोळा सौंदर्यवती जिंकण्यासाठी त्यांना रॅम्पवॉकचे प्रशिक्षण स्मृती भतिजा यांनी दिले. यापूर्वी तिने मिस इंडिया 2019 च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. तिन्ही वेगवेगळ्या फेरीत रिचा हावरे (राजकुमारी), नीता शर्मा (फॉरेव्हर प्रिटी) आणि आयएनएफडी वाशी यांनी डिझाईन केलेले ऑउटफिट परिधान करून रॅम्पवॉक केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शेट्टी हिने केले.

Exit mobile version