अमित शाहांच्या सभेचे बॅनर फाडले; घोषणाबाजीही केली

| संभाजीनगर | वृत्तसंस्था |

जिल्ह्यात पुन्हा मराठा आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी (दि.05) होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले. तसेच, घोषणाबाजीही करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचादेखील समावेश आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.05) अमित शाह हे संभाजीनगर शहरात जाहीर सभा घेत आहेत. या सभेची तयारी भाजपाच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केले जाऊ देत नाही. त्यामुळे आमच्या गावातदेखील  बॅनर लावतांना ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी अन्यथा बॅनर लावू देणार नाही, असे म्हणत मराठा आंदोलकाने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहे. तसेच, यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

Exit mobile version