| पाली/बेणसे | वार्ताहर |
मनसे नेते व मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी कोकण दौर्यात पेण-सुधागड मतदार संघातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला. पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी अमित ठाकरे यांनी कोकण दौरा केला
यावेळी अमित ठाकरे यांनी पक्षसंघटना बांधणी तसेच कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनसे विद्यार्थी सेना सुधागड तालुका सचिव भावेश बेलोसे, अजय अधिकारी, शेखर चव्हाण, राजु जोशी, विलास पवार, रोहित यादव, केवल ठक्कर व सचिन झुंजारराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.