अमित ठाकरेंचा मुरुडमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

| मुरुड | वार्ताहर |
मनवि सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे रायगडच्या दौर्‍यावर असून,रविवारी त्यांनी मुरुडमध्ये मनवि सेनेच्या युवकांशी संवाद साधला. सध्या कोकणातील विद्यार्थी सेना बळकट व सक्षम करण्याचा माझा मानस आहे.कारण लवकरच युनिव्हरसिटी च्या सिनेट सदस्यांची निवड होणार आहे.यासाठी कोकणातील विद्यार्थी सेना बळकट करून जास्तीती जास्त सदस्य निवडून जावेत यासाठी कोकण दौरा सुरु अमित ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी मनस जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुरुड येथील गोल्डन स्वान हॉटेल येथे त्यांनी पत्रकारांची भेट घेऊन चर्चाही केली.
यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की ,महारष्ट्राच्या राजकारणात अचानक बदल घडून आला ही आश्‍चर्यजनक बाब असून एकाचवेळी 40 आमदार गट प्रस्थापित करीत असतील तर त्यामागे आमदार जे बोलत आहेत त्यात सत्य असलेच पाहिजे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. मुरुड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला पदमदुर्ग किल्ला हा जीर्ण अवस्थेत असून सुद्धा याकडे लक्ष देण्याची मागणी पत्रकारांनी अमित ठाकरे यांच्या कडे केली असता त्यांनी हा प्रश्‍न राज ठाकरे यांच्याकडे बोलणार असून ते या किल्ल्यासाठी निश्‍चित काहीतरी करतील असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

Exit mobile version