अमोल पाटील यांची जयंत पाटील यांच्याकडून सांत्वनपर भेट

| वाघ्रण | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि शेकापचे कार्यकर्ते अमोल पाटील यांचे वडील सुधीर पाटील यांचे गुरूवारी (दि.13) निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी चारुता, मुलगे अमोल व हर्षल, स्नुशा व नातवंडे असा परिवार आहे. सुधीर पाटील यांचे दिवसकार्य मंगळवारी (दि.25) भुवनेश्वर येथे होणार असल्याचे पाटील कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.18) अमोल पाटील यांच्यासह कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुप्रिया पाटील, कमळाकर वाघमोडे, अनिल पाटील, रुपेश पाटील, अनिल पाटील, अनिल धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version