मोटारसायकल आणि दोन कारमध्ये अपघात; तीन जण जखमी

| माणगांव | प्रतिनिधी |

मोटारसायकल व दोन कारमध्ये विचित्र अपघात होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 16) नोव्हेंबर रोजी दु. 2 वा. च्या सुमारास  जखमी सचिनकुमार राऊत हे त्यांची पत्नी वेदीका व मुलगी रित्वी यांचासह माणगाव येथे त्यांचा ताब्यातील मोटार सायकलवरून जात असताना माणगाव म्हसळा रोडवरून समोरून येणारा कारचालक आयुब  युसुफ शरिफ, (35), रा. मुंबई याने अतीवेगाने, बेदारकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष  करुन ठोकर मारुन अपघात  झाल्याने मोटार सायकल ही मागुन येणाऱ्या कार हीस धडकली.  या अपघात दुचाकीवरून प्रवास करणारे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत व तिन्ही गाडयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. गणेश समेळ करीत आहेत. 

Exit mobile version