राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत निक्षय मित्र बनण्याचे आवाहन

| अलिबाग । वार्ताहर ।

क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक क्षयरुग्णांना सहाय्य देवून मदत करुन आपण निक्षय मित्र बनू शकता. तरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी निक्षय मित्र बनण्यासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले. ज्या इच्छुक नागरिकांना या क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये सक्रिय होऊन क्षयरुग्णांना सहाय्य करायचे आहे. त्यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र, रायगड-अलिबाग, कार्यालयीन संपर्क: 02143-224703, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील: 9423893307, ई-मेल: dtomhrgdrntcp.org येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version