आंनद मढवी यांचे अपघाती निधन

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरले गावचे प्राणीमित्र आंनद मढवी (45) यांचे सोमवारी सकाळी गव्हाण फाटा परिसरात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह उरण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. आंनद मढवी हे चिरले येथील घरातून पनवेलकडे कामानिमित्त जात असताना गव्हाण फाटाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आंनद मढवी हे वन्यजीव निसर्ग संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आनंद मढवी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलं व भाऊ असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version