महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंद पाटील

। पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची बैठक मंगळवारी (दि.27) बेलापूर येथील कार्यालयात पार पडली. यामध्ये असोसिएशनची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये आनंद विलासराव पाटील यांची अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महासचिव म्हणून हितेश सावंत आणि खजिनदार म्हणून महेश माटे यांची निवड करण्यात आली.

यावेळी आनंद पाटील यांनी मावळते अध्यक्ष संतोष आंबवणे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी त्यांनी असोसिएशनची पुढची वाटचाल कशी असेल याबतीत विस्तृत माहिती दिली. या महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या बैठकीसाठी संग्राम पाटील, के.के. म्हात्रे, मधू पाटील, मावळते महासचिव बाबासाहेब भोसले, खजिनदार लक्ष्मण साळुंखे, राजेंद्र कोलकर, प्रवीण शेट्ये, अजित येलमार, आशिष कवडे, सुनील ठोंबरे, उत्तम येलमार, संजय इंगळे, पवन देवलकर आदी सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version