अनंत महाराज पुण्यतिथी साजरी

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील नाते येथील श्री सद्गुरु अनंत महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. 50 वर्षाहून अधिक काळापासून सोहळा साजरा होत आहे. उत्सव कमिटीतर्फे हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात श्रद्धापूर्वक रितीने साजरा करण्यात आला. सकाळी पालखी मिरवणूक, समाधीदर्शन, महाप्रसाद त्याचप्रमाणे सायंकाळी हरिपाठ व भजन अशा निरनिराळ्या प्रकारे अत्यंत भक्तिमय वातावरणात हा पुण्यतिथी सोहळा पार पडला. हिरवळ सामाजिक ट्रस्ट तर्फे अध्यक्ष किशोर धारिया सहपरिवार सहकुटुंब त्यांच्या सर्व मित्र परिवारासह जातीने या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी हजारो भक्तगणांनी या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरु अनंत महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

Exit mobile version