| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलकडे येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत यशवंत पाटील यांचे सोमवारी (दि.12) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, सहा भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. बेलकडेचे माजी उपसरपंच सुहास पाटील यांचे वडील, तर स्नेहा पाटील यांचे ते सासरे होत. त्यांच्या पार्थिवावर बेलकडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बेलकडे ग्रामस्थ, नातेवाईक, शेकापसह विविध पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार, दि. 21 ऑक्टोबर रोजी 9 वाजता, तर तेरावे शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.







