| रायगड | प्रतिनिधी |
कै. शरद (बापू) पुरुषोत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ राशीतले नारळ फोडी स्पर्धेत अनया निलेश पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 5555 रुपये व चषक अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. चेंढरे येथील कृष्णदर्शन सोसायटी समोर इंडियन पेट्रोल पंप येथे कै. शरद (बापू) पुरुषोत्तम पाटील यांच्या स्मरणार्थ राशीतले नारळ फोडी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 64 संघ सहभागी झाले होते. या नारळ फोडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक – 4444 व चषक तृतीय क्रमांक श्रीहान वर्तक वरसोली – 2222 व चषक अनिकेत कदम – चेंढरे चतुर्थी क्रमांक – सौरभ वाळवण – रामनाथ – 1111 व चषक यांना अलिबाग चे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.