विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला?

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुंबईतील अंधेरी येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. राज्यातील ६ राज्यातील ७ जागेसाठी पोटनिवडणुका पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असताना ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पक्षचिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version