। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
सावंतवाडी तालुकाअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनीस पदांसाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. चौकुळ, कुंभवडे, नेने, केसरी, फणसवडे, केगद, कोलगाव, कुणकेरी गावडेवाडी, कुणकेरी लिंगाचीवाडी, कुणकेरी आयनगाळू, ओटवणे, माडखोल, रोणापाल, पाडलोस, मडुरा, तांबुळी, फुकेरी, नेतर्डे, डेगवे, सरमळे, धाकोरे, आरोंदा, नेमळे, कारिवडे, सांगेली, इन्सुली, मळेवाड, आदी सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रातील मदतनीस रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज 30 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सावंतवाडी कार्यालय यांच्याकडे देण्यात यावेत. तसेच, अधिक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय सावंतवाडी येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







