| पेण | प्रतिनिधी |
अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनाबाबत शासन सतत चालढकलपणा करुन कर्मचार्यांची फसवणूक करत असल्याने कर्मचार्यांनी आरपारची लढाई सुरु केली आहे. एक महिनाभर संप पुकारुन देखील शासनाने अंगणवाडी कर्मचार्यांकडे दुर्लक्ष केल्याने 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औवचित्य साधून मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. या संदर्भात पेण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी पेण तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी लेखी निवेदन देखील दिले आहे.
यासाठी पेण तालुक्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी तहसिलदार प्रसाद कालेकर, व विस्तार अधिकारी डी.एच. जाधव यांना निवेदन दिले असून, निवेदन देण्यासाठी प्रणाली पाटील, नंदा बडे, प्रतिभा पाटील, निता मानकवळे, आशा म्हात्रे, ज्योती डंगर, अर्चना पाटील आणि पुनम पाटील उपस्थित होत्या.
अंगणवाडी कर्मचार्यांचे तहसिलदारांना निवेदन
