। पनवेल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मारुती काथोर फडके यांचे बुधवारी (दि.19) निधन झाले. मृत्युसमयी ते 69 वर्षांचे होते. मारुती फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिल फडके यांचे वडील होतं. नेरे परिसरात एकत्र कुटुंबाचे पुरस्कर्ते व धार्मिक वृत्तीचे अशी मारुती यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले व मोठा फडके परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य दि.3 मार्च रोजी बोणशेत येथील राहात्या घरी होणार असल्याचे फडके कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.