पशू पक्षांचा अधिवास धोक्यात

वाढत्या तापमानामुळे पक्षीप्रेमी सरसावले

| माणगाव | वार्ताहर |

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. जंगलांमध्ये तसेच पशू पक्षी अधिवासात पाणी व खाद्य पदार्थांची होत जाणारी कमतरता यामुळे पशू पक्षांचे अधिवास धोक्यात आले आहेत. पशू पक्षांना पाणी व खाद्य पदार्थांची उणीव भासू नये यासाठी पक्षी प्रेमी नागरिक सरसावले असून खास पक्षांसाठी पाणी व खाद्य पदार्थांची अंगणी, परसदारी, घराचे सज्जे व टेरेसवर व्यवस्था करण्यात येत आहे.

उन्हाळा सुरू झाल्यावर मोठया प्रमाणात जंगलातील प्राणी पक्षी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये खास करुन पाणी व अन्न पदार्थांची मोठी कमतरता भासते. यामुळे अनेक जंगली पशू पक्षी आपला अधिवास सोडून जातात. उन्हाळी दिवसात पशू पक्षांना पाणी व अन्न याची उणीव भासू नये यासाठी पर्यावरण प्रेमी, पक्षी प्रेमी नागरिक पुढे सरसावले असून गाव शहरात घरांच्या अंगणी, परसदारी, बाल्कनी इत्यादी ठिकाणी आवर्जून पाण्याची सुविधा केली जात आहे. खास पक्षांसाठी पाणी व अन्न ठेवले जात आहे. लहान मडकी, भांडी यामधून पाण्याची व्यवस्था केली जात आहे. पशू पक्षी, भटके प्राणी यांना या व्यवस्थेचा उपयोग होत असून अशा कुत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या मडकी, भांड्यातून पक्षी अन्य प्राणी पाणी पिताना दिसत आहेत. पशू पक्षांसाठी ऐन उन्हाळ्यात अशा प्रकारे पाण्याची सुविधा निर्माण होत असल्या बद्दल निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमीनी समाधान व्यक्त केले आहे.

उन्हाळी दिवसात अनेक पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जंगलातील वणवे व अन्य कारणांमुळे अन्न ही अपुरे मिळते ही बाब लक्षात घेऊन घराच्या खिडकीत पक्षांसाठी खास पाणी व धान्य ठेवले आहे. अनेक पक्षी या ठिकाणीं येऊन बिनधास्त पाणी पितात.

दीपक ठाकुर, पक्षी प्रेमी.

उन्हाळी वातावरणात या वर्षी तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज वाढत आहे. गेल्या काही दिवसांत जंगलात अनेक वेळा वणवे लागले आहेत अनेक पक्षी हीकडे तिकडे फिरताना दिसतात. अशा पक्षांना पाणी या सुविधा उपलब्ध करावी या हेतूने घरच्या अंगणात खास पक्षांसाठी पाणी ठेवले जाते. या ठिकाणी आवर्जून अनेक पक्षी व भटके प्राणी येऊन पाणी पितात.

मिहिर मोंडे,
प्राणीप्रेमी.

Exit mobile version